Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रपीएम किसानचा 20 जूनला मिळणार हप्ता

पीएम किसानचा 20 जूनला मिळणार हप्ता

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील 20 वा हप्ता लाभार्थ्यांना 20 जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. ई-केवायसी व आधार सीडिंग ज्यांचे नाहीत त्यांनी लवकरात लवकर केवायसीचे कामे करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

 

शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्ग हप्ता मिळण्यासाठी किसान लाभार्थ्यांसाठी फॉर्मर आयडी तयार करणे आवश्यक असून, आतापर्यंत 1 लाख 25 हजार 740 लाभार्थ्यांनी फॉर्मर आयडी तयार केला असून अद्यापही 46 हजार 717 लाभार्थी प्रलंबित आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावयाची आहे. शेतकर्‍यांनी पीएम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी ई-केवायसी, आधार सीडिंग व फॉर्मर आयडीची पूर्तता 20 जूनपूर्वी व्हावी, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -