Monday, February 16, 2026
Homeइचलकरंजीजादा परताव्याच्या आमिषाने ४३ लाखाची फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषाने ४३ लाखाची फसवणूक

गुंतवणूकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवून ४३ लाख ४३ हजार २०६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेया जैन या महिलेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय केरवा ठिगळे (वय ४० रा. गुरुकन्नननगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फेसबुक व टेलिग्रामच्या माध्यमातून श्रेया जैन या महिलेने फिर्यादी धनंजय ठिगळे यांच्याशी संपर्क साधला. तिने सोशल मिडीयावरुन प्लस ५०० या कंपनीची माहिती देत गुंतवणूकीचे पर्याय सुचवत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एक लिंक पाठवून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. जैन हिच्या सांगण्यावरून ठिगळे यांनी ३१ मार्च २०२५

 

४३ लाखाची फसवणूक

ते ४ जून २०२५ या कालावधीत कंपनीने पाठविलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात ४२ लाख ४३ हजार २०६ रुपये भरले. परंतु त्याचा | कोणत्याही प्रकारचा परतावा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे | ठिगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसात श्रेया | जैन हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -