Wednesday, September 27, 2023
Homeसांगलीप्रियकराच्या मदतीने आईने केला मुलाचा खून, दाेघांना अटक

प्रियकराच्या मदतीने आईने केला मुलाचा खून, दाेघांना अटक

मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) याचा खूनप्रकरणी त्‍याची आई प्राची सुशांत वाजे (वय 29, रा. वाळवा, सध्या रा. मुंबई) व तिचा प्रियकर अमर विश्वास पाटील (वय 36, रा. बिळाशी ता. शिराळा, सध्या रा. मुंबई) या दाेघांना अटक करण्‍यात आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने या दाेघांनी मनन याचा खून केला. यानंतर वाकुर्डे येथे मननवर अंत्यसंस्कार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, अशी  माहिती आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी दिली.

याप्रकरणी अजित सिद यांनी सांगितले की,  सुशांत वाजे यांना पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमर पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय हाेता. अमर याने प्राचीला ऑगस्ट 2021 ते दि. 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मुलगा मनन याच्यासह मुंबई येथे आपल्या घरी नेऊन ठेवले होते. तिथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमर यांनी मननचा छळ सुरू केला. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून केला. अमरने मननचा मृतदेह त्याच्या (एम.एच. 13 एडी 8080) गाडीतून बिळाशी (ता. शिराळा) येथे नेला. वाकुर्डे येथे मननवर अंत्यसंस्कार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र