Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रदेवकेवाडीतील तरुणाची वेदगंगा नदीच्या पुरात उडी

देवकेवाडीतील तरुणाची वेदगंगा नदीच्या पुरात उडी

भुदरगड तालुक्यातील देवकेवाडी येथील अमित तानाजी रोकडे (वय 27) या तरुणाने भाच्याला फोनवरून जीवन संपवत असल्याचे सांगून, कुर येथील वेदगंगा नदीत पूराच्या पाण्यात उडी मारली.

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, भुदरगड पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून दुसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

 

अमित हा कागल येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. शनिवारी तो गावी देवकेवाडी येथे परतला होता. त्याच रात्री साडेआठच्या सुमारास त्याने वेदगंगा नदीत उडी मारली. ही घटना काही नागरिकांनी पाहताच ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; पण अंधारामुळे शोधकार्यात अडथळे आले. घटनास्थळावरून अमितचा मोबाईल आणि जॅकेट सापडले आहे. पोलिसांनी मोबाईलमधील शेवटच्या कॉलच्या आधारे संपर्क साधला असता, तो फोन अमितचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याने शेवटचा फोन त्याचा भाचा सुरज वायंगडे (रा. सरवडे) याला केला होता. अमितने यापूर्वीही अनेकदा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -