Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्र200 रुपयांपेक्षा कमी पैशात उपलब्ध आहेत हे 5 रिचार्ज प्लॅन

200 रुपयांपेक्षा कमी पैशात उपलब्ध आहेत हे 5 रिचार्ज प्लॅन

आजकाल मोबाईल रिचार्जच्या किमती इतक्या वाढल्या आहेत कि सर्वसामान्य यूजर्सना रिचार्ज करणे परवडत सुद्धा नाही. दर महिन्याला रिचार्जसाठी पैसे आणायचे तरी कुठून असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्ही सुद्धा सततच्या मोबाईल रिचार्जने वैतागला असाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या ५ रिचार्ज बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या खर्चात बचत होऊ शकेल. मात्र यासाठी तुमच्याकडे BSNL सिम असणे आवश्यक आहे. होय, देसी टेलिकॉम कंपनी असलेली BSNL आपल्या ग्राहकांना नेहमीच परवडेल अशा किमतीत रिचार्ज प्लॅन आणत असते. आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट असे ५ बीएसएनएल प्लॅन सांगणार आहोत जे २०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत.

 

) १९७ रुपयांचा रिचार्ज –

यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे १९७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन…. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवसाची आहे. परंतु सुरुवातीच्या १५ दिवसांसाठी, ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येतो. १५ दिवसांनंतर, डेटा मर्यादा दररोज ५० एमबी पर्यंत कमी केली जाते. यासोबतच, इंटरनेट स्पीड देखील कमी होतो.

 

2) १४९ रुपयांचा रिचार्ज – Mobile Recharge Under 200

दुसरा रीचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे १४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या प्लॅन मध्ये ग्राहकांना २४ दिवसाची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. या २८ दिवसात यूजर्स दररोज १ जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ घेऊ शकतात. इतर कंपन्यांशी तुलना केल्यास बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना बराच परवडतोय.

 

१४७ रुपयांचा रिचार्ज

तिसरा रीचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे १४७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवस आहे. परंतु या प्लॅन मध्ये यूजर्सना फक्त १० जीबी इंटरनेट डेटाचा लाभ मिळतो. एकदा का हा डेटा संपला कि मग इंटरनेट स्पीड ४० केबीपीएसपर्यंत कमी होते. या प्लॅनसोबत बीएसएनएलन कंपनी ग्राहकांना रोमिंगसह अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे देत आहे.

 

4) १४१ रुपयांचा रिचार्ज

चौथा रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे १४१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… हा रिचार्ज प्लॅन खास करून प्रामुख्याने महाराष्ट्र कृषी (MH कृषी) ग्राहकांसाठीआहे. या प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या कालावधीत ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा चा लाभ घेता येतो. तसेच अनलिमिटेड कॉल आणि दररोज २०० एसएमएस उपलब्ध या रिचार्ज प्लॅन मध्ये उपलब्ध आहेत. Mobile Recharge Under 200

 

 

5) १०७ रुपयांचा रिचार्ज –

पाचवा रिचार्ज प्लॅन आहे तो बीएसएनएलचा १०७ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… हा प्लॅन ३५ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो . यामध्ये ग्राहकांना ३ जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. एकदा का हा डेटा संपला कि मग इंटरनेट स्पीड ४० केबीपीएस पर्यंत कमी होतो. तसेच बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये २०० मिनिटे मोफत कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये राष्ट्रीय रोमिंगचा देखील समावेश आहे. २०० मिनिटे संपल्यानंतर, लोकल कॉलसाठी प्रति मिनिट १ रुपये आणि राष्ट्रीय कॉलसाठी प्रति मिनिट १.३ रुपये शुल्क आकारले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -