पावसाळ्याच्या दिवसांत अनेको आजार होण्याची शक्यता बळावते. जसे कि सर्दी – पडसे, ताप, डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ. या सर्व आजारांवर वेळीच उपाय करणे गरजेचे असते अन्यथा हे रोग गंभीर स्वरूपाचे होऊ शकतात. यातील सर्दी पडसे आणि ताप हे आजार सर्वसामान्य आहेत. मात्र अनेकांना हमखास होणारा आजार म्हणजे कावीळ. याला हेपिटायटीस बी म्हणूनही ओळखले जाते. काविळचा त्रास यकृताच्या आरोग्यावर परिणाम करतो. यामुळे कावीळ झाल्यास वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा कावीळचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी अॅलोपॅथी उपचारांपेक्षा आयुर्वेदीक आणि नैसर्गिक उपायांची मदत घेतली जाते. कारण नैसर्गिक उपायांमध्ये काविळीवर जालीम उपाय उपलब्ध आहेत. परंतु नैसर्गिक उपायांचा अवलंब करताना आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात काविळीवरही नैसर्गिक उपाय कोणते ते खालीलप्रमाणे:-
आवळा – आवळ्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. तसेच आवळ्यातील अॅन्टीऑक्सिडंट घटक यकृताचे नुकसान टाळण्यास मदत करतात. त्यामुळे कावीळ झाल्यास त्यातून बरे होण्यासाठी नियमित आवळा खाणे किंवा आवळ्याचा रस पिणे लाभदायक आहे.
लिंबू – आवळ्याप्रमाणेच लिंबूदेखील काविळीपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. साहजिक आहे कि, ऋतूमानानुसार आवळा प्रत्येकवेळी उपलब्ध नसतो. मात्र लिंबू कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होतात. त्यामुळे काविळीतून बरे होण्यासाठी लिंबाचा रस प्या. लिंबातील ‘व्हिटॅमिन सी’ घटक hepato-protective काविळीपासून यकृताचे संरक्षण करण्यास सक्षम असतात.
हळद – कावीळ झालेल्या रुग्णांनी हळद खाऊ नये. कारण हळदीचा पिवळा रंग शरीरातील टिश्यू आणखीच पिवळे करतात. हा एक निव्वळ गैरसमज आहे. उलट हळद दाह शामक, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अॅन्टी मायक्रोबिएल गुणधर्मयुक्त असते. ज्याचा फायदा कावीळचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी होतो. यासाठी ग्लासभर गरम पाण्यात १/४ चमचा हळद व्यवस्थित मिसळून संपूर्ण दिवसातून साधारण तीनवेळा प्यावे. यामुळे काविळीवर मत करणे सोप्पे जाते.
टोमॅटो – कोणत्याही हंगामात टोमॅटो अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कावीळ झाल्यास कोणताही पर्याय सुचत नसेल आणि अन्य पर्याय उपलब्ध नसतील तर घराघरात आढळणारा एक टोमॅटो पुरेसा आहे. कारण टोमॅटोला लाल रंग देणारे lycopene हे घटक यकृताचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे कावीळ झालेल्या रुग्णांनी नियमित सकाळी रिकाम्यापोटी ताज्या टोमॅटोचा रस प्यावा किंवा कच्चा टोमॅटो खावा.
मूळा – मूळाच्या पानांचा रस यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण मूळ्यामध्ये डीटॉक्सिफाईंग घटक बिलरूबीनचे वाढलेले प्रमाण आटोक्यात ठेवण्याची क्षमता असते. यासाठी मूळ्याची पानं स्वच्छ धुवून त्याचा रस काढा आणि हा रस दहा दिवस नियमित रोज ग्लासभर इतक्या मात्रेत प्या.
कडूलिंब – कडुलिंब अनेको आजारांवर प्रभावी औषधी मानला जातो. कारण कडुलिंबातील अॅन्टी व्हायरल घटक कोणत्याही आजारावर जालीम प्रभाव करतात. हेच घटक कावीळचा त्रास आटोक्यात आणण्यासदेखील मदत करतात. यामुळे यकृतात तयार होणारे विषारी घटक कमी होतात. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी ३० मिली कडूलिंबाचा रस १५ मिली मधासोबत आठवडाभर घ्या. यामुळे काविळीचा प्रभाव कमी होऊ लागतो.
अर्जुना – अर्जुना हि एक प्राचीन कालावधीपासून वापरात असलेली एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. अर्जुनाच्या झाडाची फांदी हृद्य आणि मूत्रमार्गाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच अर्जुनातील अलकालॉइड्स यकृतामध्ये कोलेस्टेरॉलची निर्मिती नियमित करण्यास मदत करतात. तसेच कावीळचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी वापरले जाणारे औषध लिव्हर ५२ यामध्ये अर्जुनाच्या अर्काचा वापर केला जातो. तसेच १/२ टीस्पून अर्जून पावडर काही थेंब शुद्ध तूपासोबत मिसळून दिवसातून दोनवेळा घेतल्यास प्रभावी असा करतात आणि काविळीपासून सुटका मिळते.