Friday, April 3, 2026
Homeइचलकरंजीमावा विक्रेत्याला अटक सहा किलोचे साहित्य जप्त

मावा विक्रेत्याला अटक सहा किलोचे साहित्य जप्त

अवैधरित्या मावा विक्री करणाऱ्या किशोर बालाजी शंकु (वय ४३, रा. रेणुकानगर झोपडपट्टी) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडुन ६ किलो सुका आणि ओला माया जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांतून

मिळालेली माहिती अशी, राजर्षी शाहु पुतळा

चौक परिसरात आदर्श मंगल कार्यालयासमोर दत्त टी स्टॉलमध्ये जिवीतास हानीकारक असलेला मावा अवैधरित्या विक्री केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी सुगंधी तंबाखू आणि विविध पत्तींचे मिश्रण हातावर बनवून ओला सुका मावा बिक्री केला जात असल्याचे आढळून आले. त्यावर कोणतेही लेबल अथवा सुरक्षेबाबत वैधानिक इशाराही लिहिलेला नव्हता. त्यामुळे मावा बनवणाच्या किशोर शंकु याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडुन १ किलो ओला आणि ५ किलो सुका असा ६ किलो माया जप्त केला. या प्रकरणी पो. कॉ. सुकुमार बरगाले यांच्या फिर्यादीनुसार शंकु याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -