Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार, टॉयलेटमध्ये नेऊन सैतानानं लचके तोडले!

अल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार, टॉयलेटमध्ये नेऊन सैतानानं लचके तोडले!

धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एका मुलीला फूस लावून तिला मेल एक्स्प्रेसमध्ये बसवून आरोपीने तिच्यावर हा अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करून त्याने मुलीला आपल्या घरीही नेलं होतं. पण घरच्यांनी पीडित मुलीला तिला परत सोडून देण्यास सांगितल्यानंतर मुलीला अकोला रेल्वेस्थानकावरच सोडून आरोपीने पळ काढला. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कल्याण रेल्वेस्थानकात एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर तिला अकोल्याला घेऊन जात असताना धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गजानन चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीला आकोला जिल्ह्यातील आपल्या घरी नेले होते. मात्र आई-वडिलांनी विरोध करत मुलीला घरी सोडण्यास सांगितल्याने आरोपीने तिला कल्याणला न सोडता अकोला रेल्वे स्थानकावरच सोडून पळ काढला. यानंतर अकोला पोलिसांनी या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत चौकशी चालू केली. तसेच कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग केला. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास करत आरोपीला अकोल्यातून बेड्या ठोकत कल्याणमध्ये आणलं. कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

आधी जवळीक निर्माण केली, नंतर…

कल्याण पूर्वेत राहणारी 16 वर्षीय तरुणीची 29 जून रोजी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना तिला आकोला येथे राहणारा आरोपी गजानन चव्हाण भेटला होता. त्याने तिच्याशी ओळख वाढवत तिच्याशी गप्पा मारत जवळीक निर्माण तेली. नंतर तिला कल्याण स्थानकातून अकोल्याकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाडीत बसवलं. पुढे इगतपुरी ते अकोल्यादरम्यान तिला एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

 

मुलीला स्टेशनवरच सोडून काढला पळ

एवढ्यावरच तो थांबला नाही. यानंतर तो तिला त्याच्या अकोला जिल्ह्यातील घरी घेऊन गेला. मात्र घरच्यांनी तिला स्वीकारण्यास नकार देत तिला घरी सोडण्यास सांगितल्याने. आरोपीने तिला कल्याणला न सोडता अकोला स्टेशनवरच सोडून पळ काढला. यानंतर अकोला पोलिसांनी याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करत कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तो गुन्हा वर्ग केला होता. या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास करत आरोपीला अकोल्यातून बेड्या ठोकत कल्याणमध्ये आणले. त्यानंतर आरोपीला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 15

 

जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करून रेल्वेत अत्याचार केल्याने त्याला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -