Friday, February 23, 2024
Homeसांगलीविट्याजवळ दोन गाड्यांची समोरा-समोर धडक; दांपत्यासह तिघांचा जागीच मृत्‍यू

विट्याजवळ दोन गाड्यांची समोरा-समोर धडक; दांपत्यासह तिघांचा जागीच मृत्‍यू

ताजी बातमी ऑनलाईन टी

विट्याजवळील नेवरी (ता. कडेगाव) येथे आज (शुक्रवार) पहाटे दोन चारचाकी गाड्यांची समोर समोर धडक झाली. या भीषण अपघातात तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील दांपत्यासह विट्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सुदर्शन गजानन निकम (रा. विटा), डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील कपिल माणिक झांबरे आणि धनश्री झांबरे अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विटा येथील पालिकेचे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचा मुलगा सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील खेराडे गावाकडून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल माणिक झांबरे हे पत्नी धनश्री आणि आपल्या अन्य नातेवाईकांसह तासगावकडून पुण्याकडे निघाले होते. यावेळी नेवरीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात प्रज्वल पुंडलिक झांबरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहे. तर या अपघातात विट्यातील संग्राम गायकवाड हा तरुण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची कडेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान, या अपघातातील सुदर्शन निकम या तरुणाच्या बहिणीचे उद्या (शनिवार) 25 डिसेंबर रोजी लग्न आहे. त्यासाठी गावदेव कार्यक्रमासाठी सुदर्शन आपल्या मित्राला घेऊन खेराडे येथे गेला होता. तेथून परतत असताना हा मोठा अपघात झाला. सुदर्शन निकम यांच्या पश्चात वडील कंत्राटदार गजानन निकम, आई आणि बहिण असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -