Sunday, November 3, 2024
Homeसांगलीआईने प्रियकराच्या मदतीने पट्टीने मारहाण करून बालकाचा केला होता छळ

आईने प्रियकराच्या मदतीने पट्टीने मारहाण करून बालकाचा केला होता छळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मनन सुशांत वाजे (वय साडे तीन वर्षे) या बालकाच्या खूनप्रकरणी मनन याची आई व तिचा प्रियकर या दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

मुलाची आई प्राची सुशांत वाजे (वय 29, रा. वाळवा, सध्या रा. मुंबई) आणि तिचा प्रियकर अमर विश्वास पाटील (वय 36, रा. बिळाशी, सध्या रा. मुंबई) अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना आष्टा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली होती. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

युक्तीवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. रणजित पाटील म्हणाले, मनन हा अमर आणि प्राची यांच्या संबंधात अडथळा ठरत होता. हे दोघे मुंबई येथील घरात मनन याला लाकडी पट्टीने मारहाण करून त्याचा छळ करीत असल्याचा व्हिडीओ उपलब्ध झाला आहे.
दोघांनी मनन याचा खून करून त्याला बिळाशी येथे आणले. येथील वाकुर्डे स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मनन याला कोरोनाची लागण झाल्याचेही त्यांनी गावकर्‍यांना सांगून त्यांची सहानुभूती मिळविली.

ते म्हणाले, अमर आणि प्राची या दोघांनी ग्रामपंचायतीमध्ये मनन याच्या मृत्यूची नोंद केली. मनन हा आजारी असताना त्याला दवाखान्यात का दाखल केले नाही, मनन याचा मृत्यू झाला असतानाही ही माहिती मनन याच्या वडिलांना का देण्यात आली नाही, या तपासाबरोबरच मुंबई येथे जावून पोलिसांना तपास करायचा आहे. त्यामुळे दोघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने प्राची व तिचा प्रियकर अमर यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -