हातउसने घेतलेल्या पैशांचे व्याज न दिल्याच्या कारणावरुन कटरने वार केल्याने एकजण जखमी झाला. विकास अरविंद घाटोळे (वय ३२, रा.विकासनगर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास स्टेशन रोड परिसरात घडली. याचाचत शिवाजीनगर पोलिसांनी सचिन दाते नामक संशयीतावर गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद विकास घाटोळे याने दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सचिन दाते याच्याकडून दोन वर्षांपूर्वी विकास याने १० हजार रुपये हातउसने घेतले होते. त्याने व्याजासह रक्कम परतही केली होती. मात्र पुन्हा दाते याने व्याजासाठी तगादा लावला होता. सकाळी स्टेशन रोडवरील एका इमारतीच्या तळघरात घाटोळे व दाते यांच्यात पुन्हा बाद झाला. घाटोळे याने व्याजाचे पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर संशयीत दाते याने कटरने पाठीवर, हातावर, खांद्यावर वार केले. यात तो जखमी झाला. इंदिरा गांधी इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात आले. अधिक तपास पोहेकों चव्हाण करीत आहेत.