Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंग'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे...

‘या ‘ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?

आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसह विदर्भातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे . दक्षिण महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता आहे . पावसाचा जोर हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणाकडे वाढणार असून पुढील चार दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार असल्याचं IMD ने सांगितलंय .

 

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल .बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल .हलक्या व मध्यम पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे .

 

पुढील 4 दिवस राज्यात कुठे काय स्थिती ?

हवामान विभागाने पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचे येलो अलर्ट दिले आहेत .यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याची शक्यता आहे .विदर्भात पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून त्यानंतर पाऊस ओसरणार आहे .

3 ऑगस्ट : अमरावती, नागपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर, नांदेड लातूर धाराशिव

4 ऑगस्ट : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड

5 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ,धाराशिव, सोलापूर, सांगली

6ऑगस्ट : बीड, परभणी, नांदेड ,लातूर, धाराशिव, सोलापूर ,सातारा ,सांगली, कोल्हापूर ,सिंधुदुर्ग

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -