सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीनसह हजारो प्रोडक्ट स्वस्त किमतीत मिळतील, परंतु आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये टीव्ही मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम डीलबद्दल माहिती सांगणार आहोत.अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला बंपर डिस्काउंटसह 32 इंच, 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच असलेल्या मोठ्या स्क्रिनचे स्मार्ट टीव्ही मॉडेल मिळतील. प्रोडक्टच्या डिस्काउंटव्यतिरिक्त, तुम्ही एसबीआय कार्डद्वारे पेमेंट करून अतिरिक्त 10 टक्के सूट देखील मिळवू शकता. इतकेच नाही तर तुमच्या सोयीसाठी व्याजमुक्त ईएमआय सुविधा देखील या सेलमध्ये उपलब्ध आहे.
32 इंचाचा रेडमी टीव्ही: अमेझॉन सेलमध्ये रेडमी एफ सिरीजमधील 32 इंचाचा मॉडेलच्या 58 टक्के सवलतीवर हा टिव्ही तुम्ही 10,499 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये 20 वॅट स्पीकर, डॉल्बी ऑडिओ, एचडी रिझोल्यूशन आणि 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट आहे.
43 इंचाचा फिलिप्स टीव्ही: जर तुम्ही 32 इंचापेक्षा थोडा मोठा म्हणजे 43 इंचाचा स्मार्ट टिव्ही खरेदी करायचा असेल तर Amazon सेलमध्ये 43 इंचाचा स्क्रीन आकार असलेला हा टीव्ही 23 टक्के सवलतीनंतर 22,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
50 इंचाचा शाओमी टीव्ही: अमेझॉन फ्रीडम सेलमध्ये, तुम्हाला 44 टक्के सवलतीनंतर हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही 27,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा टीव्ही 30 वॅट स्पीकर्स, डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी व्हिजन, HDR10, 4K रिझोल्यूशन आणि 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
55 इंचाचा कोडॅक टीव्ही: 55 इंचाचा स्क्रीन आकार असलेला हा टीव्ही तुम्हाला 51 टक्के सवलतीनंतर 29,479 रुपयांना खरेदी करू शकता. या टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही 4के अल्ट्रा रिझोल्यूशन, 40 वॅट साउंड आउटपुट, एचडीआर10 आणि ड्युअल बँड वाय-फाय सपोर्टसह येतो.