Saturday, August 23, 2025
Homeकोल्हापूरपूरस्थितीमुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या

पूरस्थितीमुळे विद्यापीठाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत बी.टेक अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा सुरू होती. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही गावांचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

 

त्यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने बी.टेक अभ्यासक्रमाच्या दोन विषयांचे पेपर पुढे ढकलले आहेत.

 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बी.टेक अभ्यासक्रमाच्या सुरू असलेल्या पुनर्परीक्षेचे गुरुवार, 21 ऑगस्ट आणि शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी होणारे दोन पेपर पुढे ढकलले आहेत. गडहिंग्लजमधील ए. डी. शिंदे कॉलेज व म्हागाव येथील बी.टेक कॉलेज परिसरात पावसाने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 21 ऑगस्टचा पेपर 4 सप्टेंबरला आणि 22 ऑगस्टचा पेपर 8 सप्टेंबरला घेतला जाणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -