Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रअकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातील अल्पवयीन मित्राकडून वारंवार बलात्कार; गर्भवती राहिल्यावर प्रकार उघडकीस, 

अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातील अल्पवयीन मित्राकडून वारंवार बलात्कार; गर्भवती राहिल्यावर प्रकार उघडकीस, 

अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्याअकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातील अल्पवयीन मित्राकडून वारंवार बलात्कार; गर्भवती राहिल्यावर प्रकार उघडकीस,  अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातील मित्राने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) परिसरात घडली असून मुलगी सात महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकील आला आहे.

 

या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भया ही 16 वर्षाची आहे तर अल्पवयीन हा 17 वर्षाचा आहे. दोघेही लोणी काळभोर परिसरातील एका इमारतीत राहतात. तर दोघेही लोणी काळभोर येथील एका नामवंत शैक्षणिक संकुलात एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. शाळेत जाताना व येताना दोघेही एकत्र येत होते.

 

दरम्यान, दोघेही एकाच शाळेत व एकाच वर्गात शिकत असताना दोघेही एकत्र अभ्यास करीत होते. दोघेजण जानेवारी 2025 महिन्यात इमारतीच्या गच्चीवर अभ्यास करत होते. तेव्हा आरोपीने गच्चीवर असलेल्या रुम मध्ये नेऊन निर्भयावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने निर्भयाच्या अज्ञानपनाचा फायदा घेतला आणि तिला धमकी देवुन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर प्रकार हा जानेवारी 2025 ते 11 सप्टेंबर 2025 या दरम्यान घडला आहे. या प्रकारातून निर्भय तब्बल 7 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर सदर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेव्हा निर्भयाच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -