Monday, December 23, 2024
Homeसांगलीसांगली : अखेर पाच दिवसानंतर गव्‍याला नैसर्गिक अधिवासात साेडण्‍यात यश

सांगली : अखेर पाच दिवसानंतर गव्‍याला नैसर्गिक अधिवासात साेडण्‍यात यश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मार्केट यार्ड परिसरात आलेल्या बारा वर्षीय गोव्याला पकडण्यात तब्बल बहात्तर तासानंतर यंत्रणेला यश आले. बुधवारी (दि.२९) रोजी सकाळी त्या गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात यश आले. यामुळे सांगलीकरांनी निश्वास टाकला.

कृष्णा नदीच्या पलीकडे सांगलीवाडीच्या शिवारात गेल्या पाच दिवसांपूर्वी दिसलेला गवा सोमवारी मध्यरात्री आयर्विन पूल ओलांडून सांगली शहरात आला आणि त्याने यंत्रणेची झोप उडविली हाेती. वन विभाग, पोलिस, प्राणीमित्र यांनी गणपती मंदिर ते वसंतदादा मार्केड यार्ड या गव्याच्या प्रवासाचा पाठलाग केला. गवा अचानकसमोर आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडाली

यानंतर गवा मार्केट यार्डमध्ये येऊन वेअर हाऊसजवळ असलेल्या एका चिंचोळ्या गल्लीत फसला. यामुळे यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. त्याला रेस्क्यू करण्यासाठी मंगळवारी पहाटेपासून सुरुवात करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात प्रशासनला यश आले. त्यानंतर त्याला बुधवारी सकाळी नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात आले.

गव्याला पकडण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी राज्य शासनाने दिलेले वन्यजीव सुरक्षित वाहतूक वाहन येथे पाचारण करण्यात आले होते. या वाहनात खास जंगली जनावरांना सुरक्षितपणे नेण्यासाठी आवश्‍यक सुविधा आहेत. जनावरांनी वाहनात धडका मारल्या तरी त्याच्या शरीराचे तापमान वाढू नये, यासाठी पाणी फरावण्याची अंतर्गत सोय यात आहे. तसेच त्याला फिरायला फार जागा राहू नये, यासाठी छोटे दोन कप्पे केले आहेत. येथे वाहनातून प्रवासात गवा खाली बसला तरी त्याला जखम होऊ नये, यासाठी त्यात भुस्सा भरण्यात आला होता. निसर्गाचा फिल देण्यासाठी गाडीत कडबा आणि गवतही टाकण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -