शहापूर येथे उघड्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तीनपानी जुगार खेळणार्या युहान सुनील भोरे (वय 21, रा.नेहरूनगर झोपडपट्टी), प्रभाकर भीमराव माळगे (36, रा. शहापूर), मुबारक महम्मद तांबोळी (59, रा. नेहरूनगर झोपडपट्टी), अजय पांडुरंग लोंढे (27, रा. तारदाळ), प्रवीण बाबुराव जाधव (22, रा.
शहापूर), विनायक नारायण जगताप (41, रा. चंदूर), दीपक प्रकाश कांबळे (33, रा. नेहरूनगर झोपडपट्टी), शिवानंद हिराप्पा आवटी (35, रा. जवाहरनगर), हुसेन मौला अंकलगे (42, रा.
शहापूर), फक्रुद्दीन महम्मद मुल्ला (48, रा. टाकवडे) या दहा संशयितांना पकडण्यात आले. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम 41 हजार 800 रुपये, 9 मोबाईल, असा एकूण 89 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ. सद्दाम गजबर सनदी यांनी दिली आहे. चार दिवसांत ही दुसरी कारवाई असून, या कारवाईने खळबळ उडाली आहे.