दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरू दत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री दत्तजयंती सोहळ्या वेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती.मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (नदिवेस नाका) यांचेवतीने श्री दत्त जयंती निमित्त 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नाम जप, यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..
सोमवार पासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग,श्री मल्हारी याग संपन्न झाले. तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीनेअखंड प्रहरे ची सेवा करण्यात आल्या. गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली रविंद्र माने
यांचे हस्ते महाआरती करण्यात आली.
दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला यावेळी आमदार डॉ. राहूल आवाडे,शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने,केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






