वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. त्यानुसार वाहन धारकाच्या घराजवळील २० किलोमीटरच्या परिसरातील टोलवर आता मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जवळच्या टोल प्लाझावर पैसे भरावे लागणार नाही.
या नवीन नियमबाबत आपण जाणून घेऊ या.
रोज लाखो वाहने महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवरुन जातात. या वाहनचालकांना रोज टोल भरावा लागतो. दरम्यान, जर तुमच्या घराजवळच टोल प्लाझा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या घराजवळील २० किलोमीटरच्या आतील टोल प्लाझावर तुम्हाला टोल द्यावा लागत नाही.
तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतेही पैसे मोजावे लागत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या या नियमामुळे टोल प्लाझाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे. त्यांना आता रोजच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाही. या सुविधेचा किती लोक लाभ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘एनएचएआय’चे टोल प्लाझाबाबत नियम काय ?
एन. एच. ए. आय.च्या नियमानुसार, ज्या वाहनधारकाचे घर कोणत्याही टोल प्लाझा असलेल्या २० किलोमीटरच्या क्षेत्रात असले त्यांना तो टोल भरावा लागत नाही. यासाठी वाहनधारकाकडे आधार कार्ड, वीजबिल किंवा रेशन कार्ड असा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा दाखवून तुम्ही त्या ठिकाणच्या टोल प्लाझावरुन मोफत प्रवास करु शकतात.
टोल माफीचा फायदा कसा मिळवायचा ?
तुम्हाला तुमच्या जवळच्या टोल प्लाझावर जायचे आहे. तिथे तुम्हाला पत्त्याचा पुरावा दाखवायचा आहे. यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोकल पास दिला जातो. यामुळे रोज या मार्गावरुन प्रवास केल्यावर तुम्हाला कोणताही टोल भरावा लागत नाही.
सरकारी आणि या वाहनांनाही टोलमध्ये सूट…
टोलमध्ये २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना टोलमधून सूट आहे. या व्यक्तींव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहनांना, जसे की पोलिस वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही टोलमधून सूट आहे. शिवाय, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे. शिवाय, आपत्ती निवारण कार्यात गुंतलेल्या एनडीआरएफ वाहनांनाही टोलमधून सूट आहे.
अधिकृत वाहनांव्यतिरिक्त, दुचाकीस्वारांनाही टोल शुल्कातून सूट आहे. हा नियम स्थापित करण्यात आला कारण दुचाकी हलक्या असतात आणि रस्त्यांवर त्यांचा कमी परिणाम होतो. म्हणून, दुचाकींसाठी फास्टॅग आवश्यक नाहीत. शिवाय, पादचाऱ्यांनाही टोल शुल्कातून सूट आहे.






