तुम्ही पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? मग तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. खरे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून अलीकडेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला.
दरम्यान योजनेचे लाभार्थी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे सरकारने लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभासाठी केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक केली आहे.
अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ उचलला असल्याचे समोर आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान केवायसीसाठी सरकारने आधी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती.
पण, मुदतीत केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नसती आणि यामुळे सरकारने आता 31 डिसेंबर 2025 ही केवायसीसाठीची अंतिम मुदत निश्चित केली आहे. मात्र तरीही लाडक्या बहिणींना केवायसी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि आता याच बाबत सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस सरकारचा नवा निर्णय काय?
खरे तर केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय सरकारने घेतला खरा पण तरीही लाडक्या बहिणींना केवायसी करताना अडचणी येत आहेत. या योजनेच्या बहुतांशी लाभार्थी या अशिक्षित आहेत आणि यामुळे अनेकांना केवायसी बाबत अजूनही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
यामुळे आता केवायसी ची जबाबदारी सरकारने थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे. ज्या लाभार्थींनी अजून केवायसी पूर्ण केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका स्वतः केवायसी करणार अशी माहिती समोर येत आहे.
शासनाने केवायसी ची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच, ज्या महिलांचे पती आणि वडील दोघेही हयात नाहीत अशा महिलांसाठी पण शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
या अशा पात्र महिलांसाठी शासनाकडून वेबसाईट मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. संबंधित महिलांनी मृत्यू प्रमाणपत्र व इतर तत्सम कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे सादर केल्यानंतर त्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण केली जाणार आहे.





