स्मृती मंधाना हीच्यासाठी गेले काही आठवडे वाईट स्वप्नांसारखी राहिले. ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर स्मृती मंधाना हीचं सांगलीत पलाश मुच्छल याच्यासह लग्न होणार होतं. मात्र लग्नात अनेक विघ्न आली. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पलाशची प्रकृती बिघडली. त्यानंतर स्मृती-पलाशचं लग्न मोडलं. स्मृतीने याबाबतची माहिती दिली. स्मृ्ती वैयक्तिक आयुष्यातील या संकटांवर मात करत खंबीरपणे उभीर राहिली. टीम इंडिया सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. स्मृती या मालिकेचा भाग आहे. स्मृतीला या दरम्यान मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजयी सलामी दिली. भारताने 122 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. स्मृतीने या सामन्यात 25 धावा केल्या. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 23 डिसेंबरला होणार आहे.
आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. स्मृतीला या रँकिंगमध्ये आयसीसीने झटका दिला आहे. स्मृतीला आयसीसी रँकिंगमधील सिंहासन अर्थात पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. स्मृतीची आयसीसी वनडे बॅट्समन रँकिंगमध्ये दुसर्या स्थानी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने स्मृतीला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
लॉरा वॉल्डवॉर्ट हीने स्मृतीला मागे टाकत पहिल्या स्थानी कब्जा केला आहे. लॉराने नुकतंच आयर्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. लॉराला त्याचा फायदा झाला आहे. लॉरा याआधीही पहिल्या स्थानी राहिली आहे.
दीप्ती शर्माची कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी
तसेच टीम इंडियाची ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. दीप्ती टी 20I रँकिंगमध्ये नंबर 1 ऑलराउंडर ठरली आहे. दीप्तीची कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
दीप्तीने विशाखापट्टणममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात 1 विकेट घेतली होती. त्याचा दीप्तीला फायदा झाला. दीप्तीने ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँड हीला पछाडत पहिलं स्थान काबीज केलं.
जेमीमाह रॉड्रिग्सचा धमाका
त्याशिवाय टी 20I बॅटिंग रँकिंगमध्ये जेमीमाह रॉड्रिग्स हीने 5 स्थानाची झेप घेत टॉप 10 मध्ये धडक दिली आहे. जेमी 14 व्या स्थानावरुन 9 व्या क्रमांकावर पोहचली आहे. स्मृती मंधाना तिसऱ्या तर शफाली वर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.





