बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांपूर्वी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता 27 डिसेंबरला बीसीसीआयने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. मराठमोळ्या आयुष म्हात्रे याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विहान मल्होत्रा याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली आहे. तसेच वैभव सूर्यवंशी याचाही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, मोहम्मद ईनान, हेनिल पटेल, देवंद्रन दीपेश, किशन कुमार सिंह आणि उधव मोहन.






