महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा धडाका सरकारने लावला आहे. विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन देतानाच लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महिला सबलीकरणाला बळ देण्याचे काम सरकारने केले आहे. इचलकरंजी शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नी देखील महायुती सरकार प्राधान्याने सोडवेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
इचलकरंजी येथे प्रभाग क्रमांक 8 मधील महायुतीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र वसंत माने, पारीसनाथ उर्फ राहुल मल्लू घाट, सौ.रुपा उदय बुगड, सौ.श्वेता मोहन मालवणकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ, होळीकट्टा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी वस्त्रनगरी इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करुन महापालिकेवर भगवा फडकवावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र वसंत माने यांनी, शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिला भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले असून घरगुती गरजांसाठी मोठी मदत होत आहे. याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधीसाठी आर्थिक पाठबळ मिळत आहे, असे सांगून या योजनेचा हप्ता लवकरात लवकर महिला भगिनींच्या खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली.
यावेळी महायुतीचे उमेदवार श्री.पारीसनाथ उर्फ राहुल घाट, सौ.रुपा बुगड, सौ.श्वेता मालवणकर यांनी मनोगत व्यक्त करत प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष उदय बुगड, मा.नगरसेवक सचिन हुक्कीरे, मोहन मालवणकर, राजेश मालवणकर, श्रेणिक मगदूम, फारुक बागवान, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, शफीक बागवान, सचिन वरपे, संतोष मुरदुंडे, आनंदा खोंद्रे यांच्यासह परिसरातील नागरिक, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



