Sunday, March 22, 2026
Homeइचलकरंजीघरगुती गॅस सिंलेडरचा स्फोट पती-पत्नी जखमीः प्रापंचिक साहित्याचे नुकसान

घरगुती गॅस सिंलेडरचा स्फोट पती-पत्नी जखमीः प्रापंचिक साहित्याचे नुकसान

येथील लालनगर परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या गॅस स्फोटात पती-पत्नी जखमी झाले. तर घराचे छत आणि प्रापंचिक साहित्याचेही नुकसान झाले. मुबारक मुल्ला, फरीदा मुल्ला असे जखमीचे नाव आहे. जखमी फरीदा मुल्ला यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात हलवले आहे.

 

लालनगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १२ जवळ मुबारक मुल्ला, फरीदा मुल्ला या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी मुल्ला यांच्या घरात रमजान ईदसाठी खीर बनवत असताना अचानक गॅस स्फोट झाला. या घटनेत घराचे छत फुटुन मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरीक जमले असता मुबारक मुल्ला व फरीदा मुल्ला जखमी झाल्याचे तर प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. मुबारक मुल्ला यांनी शेजारील नागरीकांच्या मदतीने जखमी फरीदा यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला सांगलीतील रुग्णालयात हलवले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -