चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील त्यांचा पहिला सामना सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. पण, या सामन्यापूर्वी CSK समोरील संकट वाढताना दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा उदयोन्मुख फलंदाज बरगडीच्या दुखापतीमुळे पहिले दोन किंवा तीन सामने मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. CSK vs RR सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर होणार आहे. पण, त्याआधी आणखी एक झटका बसला आहे, ब्रेव्हिसच्या माघारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. ब्रेव्हिसने मागील पर्वात ६ सामन्यांत १८० च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.
डेवॉल्ड ब्रेव्हिसने २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो MI साठी २०२२ व २०२४ या कालावधीत १० सामने खेळला त्यात त्याला २२० धावा करता आल्या होत्या. पण, चेन्नईकडून २०२५ मध्ये त्याने चांगला खेळ केला. जॉन्सन स्पेन्सरही ६-७ सामन्यांना मुकणार आहे, तर नॅथन एलिसने स्पर्धेतूनच माघार घेतली आहे. त्यामुळे चेन्नईची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
Chennai Super Kings (CSK)
३० मार्च: वि. राजस्थान रॉयल्स – सायंकाळी ७:३० वाजता, गुवाहाटी
०३ एप्रिल: वि. पंजाब किंग्स – सायंकाळी ७:३० वाजता, चेन्नई
५ एप्रिल: वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु – सायंकाळी ७:३० वाजता, बंगळूरु
११ एप्रिल: वि. दिल्ली कॅपिटल्स – सायंकाळी ७:३० वाजता, चेन्नई
१४ एप्रिल: वि. कोलकाता नाईट रायडर्स – सायंकाळी ७:३० वाजता, चेन्नई
१८ एप्रिल: वि. सनरायझर्स हैदराबाद – सायंकाळी ७:३० वाजता, हैदराबाद
२३ एप्रिल: वि. मुंबई इंडियन्स – सायंकाळी ७:३० वाजता, मुंबई
२६ एप्रिल: वि. गुजरात टायटन्स – दुपारी ३:३० वाजता, अहमदाबाद
०२ मे: वि. मुंबई इंडियन्स – सायंकाळी ७:३० वाजता,चेन्नई
५ मे: वि. दिल्ली कॅपिटल्स – सायंकाळी ७:३० वाजता, दिल्ली
१० मे: वि. लखनौ सुपर जायंट्स – दुपारी ३:३० वाजता,चेन्नई
१५ मे: वि. लखनौ सुपर जायंट्स – सायंकाळी ७:३० वाजता,लखनौ
१८ मे: वि. सनरायझर्स हैदराबाद – सायंकाळी ७:३० वाजता,चेन्नई
२१ मे: वि. गुजरात टायटन्स – सायंकाळी ७:३० वाजता, चेन्नई


