Wednesday, April 1, 2026
Homeकोल्हापूरमुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द...

मुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द मुश्रीफांनी दिली कबुली

कोल्हापूर ‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सुद्धा भेटणार आहे.

 

कोणाला किती जागा पाहिजेत, याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय नेते घेतील’, असे ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयातील संचालकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘मे महिन्यात संचालकांची मुदत संपते. तत्पूर्वी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निर्णय व्हावा, अशी विनंती आम्ही सर्व संचालक नेत्यांना करीत आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे अवसायनातील संस्थांची सुनावणी तातडीने घेऊन निर्णय द्यावा, अशी मागणी केली आहे. याचवेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना प्रत्यक्षात भेटून निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी करीत आहोत.

 

आम्ही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अमल महाडिक यांचीही भेट घेणार आहोत. आमदार सतेज पाटील यांनाही दोन दिवसांत भेटणार आहे. संघाचे कामकाज अतिशय चांगले चालले आहे. दूध उत्पादकांना वाढ दिली आहे. अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठीही ती बिनविरोध करावी, अशी मागणी केली आहे. निर्णय मात्र सर्व नेते एकत्रितपणे घेतील.

 

बेलवाडेंचा पुन्हा कार्यकारी संचालकांना भेटण्याचा प्रयत्न

 

महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी आज पुन्हा एकदा गोकुळ शिरगाव येथील ‘गोकुळ’च्या प्रकल्पावर कार्यकारी संचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत आत प्रवेश दिला नाही. यानंतर बेलवाडे यांनी थेट गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद देण्यासाठी आवश्‍यक माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले.

 

‘२०२३ मध्ये ११०८ संस्थांना अवसायनाच्या नोटिसा निघाल्या. पैकी ७६९ संस्थांना पोहोचल्या, ४० संस्थांच्या परत आल्या, तर ३०० संस्थांना पोहोचल्याच नाहीत. काही संस्थांचे पत्तेच मिळाले नाहीत. काही संस्थांचे दूध शुन्य आहे. अशा सर्व संस्थांची सहाय्यक निबंधकांनी ‘इन कॅमेरा’ चौकशी करावी. नियमातील संस्थांना गोकुळच्या पोटनियमाप्रमाणे मतदानाचा अधिकार द्यावा. काही संस्थांचे दूध असतानाही त्यांना अवसायनाची नोटीस आल्यामुळे त्यांच्यावतीने आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. कोणत्याही संस्थेवर अन्‍याय होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -