Tuesday, April 14, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार

महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस (heat)हवामानाचा तडाखा अधिकच तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून तापमानात मोठी वाढ होणार आहे.

 

विशेषतः विदर्भ, मराठवाडा (heat)आणि मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका वाढणार असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

भरपूर पाणी पिणे, हलके (heat)कपडे परिधान करणे आणि थेट उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे. काही भागांत उष्ण वारेही वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो. प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -