कोल्हापूर शहरानजीक असलेल्या एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. व्याजाच्या पैशांसाठी एका महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पडल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
वाहन चालक म्हणून सोबत येणाऱ्या एका व्यक्तीने पीडित महिलेला पैसे देऊ केले होते. तो वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. शेवटी त्याने व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवले. पीडितेला तसं करण्यास त्याने भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
वारंवार पैशांची मागणी करुन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. आरोपीने हॉटेलवर नेऊन नग्न अवस्थेत फोटो आणि व्हिडीओ काढून जबरदस्ती केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या जावयालाही मारहाण केली.
सदरील घटना कोल्हापूर शहराजवळच असलेल्या एका गावात घडली आहे. अमित सावंत नावाच्या संशयितावर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. व्याजाच्या पैशांसाठी महिलेला शरीरसंबंध ठेवण्यात लावल्याच्या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.




