Thursday, April 23, 2026
Homeमहाराष्ट्रआता OTP शिवाय पैसे कट होणार? ऑनलाइन पेमेंटबाबत RBI चा मोठा बदल;...

आता OTP शिवाय पैसे कट होणार? ऑनलाइन पेमेंटबाबत RBI चा मोठा बदल; तुमच्या खात्यावर काय परिणाम?

तुमच्या बँक खात्यातून तुमचे परवानगीशिवाय पैसे कापले जात असतील तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. RBI ने ई-मँडेट (e-mandate) संदर्भातील नियमांमध्ये बदल करून ऑटो-डेबिट प्रणाली अधिक सुरक्षित केली आहे.

 

या बदलामुळे दरमहा EMI, सबस्क्रिप्शन किंवा बिल आपोआप भरले जाणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला, या नवीन बदलाविषयी अधिक जाणून घेऊया.

 

ऑटो-डेबिट OTP शिवाय होणार

 

ई-मँडेट म्हणजे तुम्ही बँक, कार्ड किंवा पेमेंट अ‍ॅपला दिलेली परवानगी, ज्यामुळे SIP, विमा प्रीमियम, EMI, OTT सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट्स आपोआप कापले जातात. पूर्वी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी OTP आवश्यक होता. त्यामुळे OTP उशिरा येणे किंवा नेटवर्क प्रॉब्लेममुळे अनेकदा पेमेंट फेल होत असे. आता नवीन नियमानुसार, 15,000 रुपायांपर्यंतचे व्यवहार OTP शिवाय होतील. उदाहरणार्थ आता 12,000 चा SIP, बिल पेमेंट हे सर्व व्यवहार आता सहज पूर्ण होतील.

 

तर क्रेडिट कार्ड आणि म्यूचुअल फंडसाठी ही मर्यादा 1 लाखांपर्यंत आहे

 

पैसे कापण्यापूर्वी महत्त्वाचे अलर्ट

 

1. नवीन नियमांमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, आता ग्राहकांना कोणत्याही ऑटो-पेमेंटपूर्वी पूर्व माहिती देणे आवश्यक असेल.

 

2. बँक किंवा संबंधित कंपनीला किमान 24 तास आधी एक अलर्ट पाठवणे आवश्यक असेल.

 

3. या अलर्टमध्ये कंपनीचे नाव, कापली जाणारी रक्कम, तारीख आणि इतर आवश्यक माहितीचा समावेश असेल. यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केव्हा आणि किती पैसे कापले जातील हे आधीच कळेल.

 

4. व्यवहार झाल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज द्यावा लागेल.

 

5. काही अयोग्य वाटल्यास, ते वेळेत ऑटो-डेबिट बंद किंवा बदलू शकता

 

ऑटो पेमेंट करण्यापूर्वी मंजुरी आवश्यक

 

RBI ने हे नियम अधिक सोपे केले असले तर ग्राहकांचे नियंत्रण कायम ठेवले आहे. e-mandate सुरू करताना पहिल्या व्यवहारासाठी OTP आवश्यक राहील. म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय कोणतीही रक्कम कापली जाणार नाही.

 

कोणत्या सेवांना नवीन नियम लागू

 

हे नवीन ऑटो पेमेंट नियम ओटीटी सबस्क्रिप्शन, विमा हप्ते, वीज आणि पाण्याची बिले आणि EMI यांसारख्या सेवांना लागू होतील. कार्ड, UPI किंवा प्रीपेड पद्धतींद्वारे केलेले ऑटो डेबिट देखील यात येतील.

 

या सेवांना नवीन नियम लागू नाही

 

काही प्रकरणांमध्ये जसे फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या ऑटो रिचार्जला हे नियम लागू होणार नाहीत. याचा अर्थ या सेवांवर जुनी पद्धतच लागू राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -