Monday, April 27, 2026
Homeअध्यात्मएक टर्निंग पॉइंट बदलतो 'या' ४ मुलांकाच्या महिलांचं नशीब; सरकारी अन् खाजगी...

एक टर्निंग पॉइंट बदलतो ‘या’ ४ मुलांकाच्या महिलांचं नशीब; सरकारी अन् खाजगी क्षेत्रावर करतात राज, घेतात लाखात पगार

न्यूमरोलॉजीनुसार आपल्या जन्माची तारीख केवळ एक आकडा नसून ती आपल्या भविष्याची आणि करिअरची गुरुकिल्ली असते. करिअर न्यूमरोलॉजीमध्ये काही असे खास मुलांक आहेत, ज्यांच्या महिलांमध्ये जन्मतःच नेतृत्वगुण आणि प्रचंड महत्त्वाकांक्षा असते.

 

विशेषतः या मुलांकांच्या महिलांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो जिथून त्यांचे नशीब पूर्णपणे पालटते. या महिला केवळ नोकरी करत नाहीत, तर सरकारी असो वा खाजगी क्षेत्र, तिथे आपली वेगळी ओळख निर्माण करतात आणि लाखांच्या घरात पगार मिळवून समाजात मानाचे स्थान मिळवतात.

 

मुलांक १

 

मुलांक १ असलेल्या महिलांवर सूर्याचे वर्चस्व असते. या महिला अत्यंत तेजस्वी आणि स्वाभिमानी असतात. त्यांच्या करिअरमध्ये साधारणतः वयाच्या २८ ते ३० व्या वर्षी एक मोठा सकारात्मक बदल होतो. हा टर्निंग पॉइंट त्यांना थेट वरिष्ठ पदावर किंवा सरकारी नोकरीत क्लास वन ऑफिसरच्या खुर्चीपर्यंत नेतो. या महिलांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, त्यामुळे त्या खाजगी क्षेत्रातही सीईओ किंवा मॅनेजर म्हणून राज करतात. त्यांची निर्णयक्षमता अचूक असल्याने त्या मोठ्या पगाराच्या पॅकेजवर सहज कब्जा मिळवतात.

 

मुलांक ५

 

ज्या महिलांचा मुलांक ५ आहे, त्यांचा स्वामी बुध असतो. या महिला अत्यंत चपळ आणि हुशार असतात. त्यांच्या आयुष्यात विवाहाच्या आसपास किंवा वयाच्या ३२ व्या वर्षी करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळते. बँकिंग, मार्केटिंग, आयटी किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात या महिलांचा दबदबा असतो. बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवण्याची त्यांची कला त्यांना खाजगी क्षेत्रात मोस्ट वॉन्टेड प्रोफेशनल्स बनवते. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे त्या क्लायंट्सना सहज आकर्षित करतात आणि परदेशातील संधीही त्यांना चालून येतात.

 

मुलांक ८

 

शनीच्या प्रभावाखाली असलेल्या मुलांक ८ च्या महिलांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो, पण त्यांचा टर्निंग पॉइंट हा कायमस्वरूपी यश देणारा असतो. वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षात त्यांना अशा एका पदाची प्राप्ती होते, जिथे सत्ता आणि पैसा दोन्ही त्यांच्याकडे चालून येतात. न्यायव्यवस्था, रिअल इस्टेट किंवा मोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये त्या उच्च पदावर काम करतात. या महिला संयमी असल्याने सरकारी क्षेत्रातही दीर्घकाळ राज्य करतात. कष्टाच्या जोरावर या महिला मध्यम वयात इतकी संपत्ती कमावतात की त्यांचे आयुष्य पूर्णपणे ऐश्वर्यसंपन्न होते.

 

मुलांक ९

 

मुलांक ९ वर मंगळाचे वर्चस्व असते. या मुलांकाच्या महिला प्रचंड साहसी आणि शिस्तप्रिय असतात. पोलीस दल, संरक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र किंवा व्यवस्थापनामध्ये त्या आपला झेंडा रोवतात. वयाच्या २७ व्या वर्षापासून त्यांच्या यशाची घौडदौड सुरू होते. कोणताही अडथळा आला तरी तो पार करून यश मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची क्षमता असल्याने त्यांना पगारासोबतच समाजात मोठा मानसन्मान मिळतो. खाजगी क्षेत्रातही त्या क्रायसिस मॅनेजर म्हणून उत्तम काम करतात आणि मोठ्या पगारावर राज करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -