Thursday, April 30, 2026
Homeमहाराष्ट्रLPG ते Credit Card पर्यंत…1 मे पासून हे 5 मोठे बदल, तुमचा...

LPG ते Credit Card पर्यंत…1 मे पासून हे 5 मोठे बदल, तुमचा खिसा कापल्या जाणार?

नव्या महिन्याची सुरुवात म्हणजेच अनेक आर्थिक बदलांची अंमलबजावणी. १ मेपासून देशभरात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपासून बँकिंग, क्रेडिट कार्ड, पीएफ आणि ऑनलाईन गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रांत बदल अपेक्षित आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य (implementation) नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम गॅसच्या किंमतीवरही दिसू शकतो. आखातातील तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी होर्मुज समुद्रधुनीतील परिस्थिती अजून स्थिर नाही. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा थेट परिणाम किचन बजेटवर होऊ शकतो.

 

दरम्यान, बँकिंग क्षेत्रात e-KYC अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे ही अंतिम मुदत असल्याने ज्यांनी अजून केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना आर्थिक व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ग्राहकांना बँक शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच काही बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून विलंब शुल्काच्या नियमांमध्येही बदल करण्यात येत असून, कमी थकबाकीवरही आता शुल्क लागू होऊ शकते.

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भातही महत्त्वाची घडामोड अपेक्षित आहे. येत्या काळात पीएफ खातेधारकांना युपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

याशिवाय, ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातही मोठे बदल लागू होणार आहेत. केंद्र सरकारने नव्या नियमांना मंजुरी दिली असून, गेमिंग कंपन्यांसाठी कडक नियमन लागू केले जाणार आहे. नवीन नियमानुसार गेमिंग सर्टिफिकेशनची वैधता ५ वर्षांवरून १० वर्षे करण्यात आली आहे, ज्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.

 

एकूणच, १ मेपासून होणारे हे बदल सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे ठरणार आहेत. काही निर्णयांमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येऊ शकतो, तर काही बदलांमुळे सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -