Monday, May 4, 2026
Homeकोल्हापूरशिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार;...

शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

बजरंग दलाचे विभागीय संयोजक नीलेश शिंदे यांना एकांतात गाठून अनोळखीने रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला.

 

अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित शाहरूख हुसेन देसाई आणि शाहीद समीर सनदे यांच्या कुटुंबीयांना दिलेला बंदोबस्त काढून घ्या आणि बजरंग दलाचे नीलेश शिंदे व माथाडी जिल्हा अध्यक्ष योगेश खाडे यांना बंदोबस्त द्या, अशी मागणी करत सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले.

 

प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आरांक्षा यादव आणि पोलिस उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी शांततेचे आवाहन केले. खबरदारी म्हणून

 

राज्य राखीव दल, जलद कृती दल, गोपनीय विभाग आणि दंगल नियंत्रण आदी पथके गावात दाखल झाली आहेत.

 

शिरोली अत्याचारप्रकरणी रात्री सात वाजता विशेष बैठक सुरू होती. बैठकीस नीलेश शिंदे उपस्थित नव्हते. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्ते घटनास्थळी आणि नंतर पोलिस ठाण्यात मोर्चाने आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -