Tuesday, May 5, 2026
Homeमहाराष्ट्रपाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं?

पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं?

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

 

यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. (Vidhansabha Election Result 2026)

 

पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.

 

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल

 

भाजप- 194

तृणमूल काँग्रेस- 93

काँग्रेस -0

डावे पक्ष- 03

इतर-2

 

Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल

 

द्रमुक- 60

अण्णाद्रमुक-65

टीव्हीके-109

इतर-9

 

Kerla Election Result 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल

 

काँग्रेस-101

डावी आघाडी -37

इतर-2

 

Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल

 

भाजप-98

काँग्रेस- 24

इतर-4

 

Puducherry Election Result 2026: पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल

 

भाजप- 22

काँग्रेस-6

इतर-1

 

Rahuri Bypoll Election 2026: राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल

 

23 व्या फेरी अखेर मिळालेली मते

 

भाजप अक्षय कर्डिले – 115855

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 24876

वंचित संतोष चोळके- 5214

अपक्ष रावसाहेब खेवरे- 7168

 

23 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 90979 मतांनी आघाडीवर

 

Baramati byelection Result 2026: बारामती पोटनिवडणुकीत 20 व्या फेरीनंतर ‘वहिनीं’चे एकतर्फी वर्चस्व

 

२१ व्या फेरी अखेर

एकूण झालेले मतदन – १०३६३

आ. वहिनींना

झालेले मतदान – १००३७

इतर मते – ३२६

 

२१ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान – १,८९,६५७

 

इतरांना गेलेली एकूण मते – ४१५६

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -