Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंगॲमेझॉन ग्रेट समर सेल 8 मे पासून होणार सुरू, फोन आणि एसींवर...

ॲमेझॉन ग्रेट समर सेल 8 मे पासून होणार सुरू, फोन आणि एसींवर मोठी सूट उपलब्ध

भारतातील ऑनलाइन खरेदीदारांसाठी मोठी बातमी आहे.(discounts)कारण आजच्या डिजिटल युगात आपण प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करतो. अशातच ॲमेझॉनने त्यांचा ग्रेट समर सेल 8 मे पासून सुरू करणार आहे. तर या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहे. या सेलमध्ये थेट सवलती, बँक ऑफर्स, शून्य-खर्च ईएमआय आणि एक्सचेंज डील्सचा समावेश असेल. एवढेच नव्हे तर या सेल मध्ये प्राइम सदस्यांना लवकर प्रवेश आणि अतिरिक्त फायदे मिळतील. जर तुम्ही नवीन गॅझेट किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी असू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलबद्दल अधिक जाणून घेऊयात.

 

ॲमेझॉन ग्रेट समर सेल 8 मे पासून सुरू होणार आहे. (discounts)तर या सेलमध्ये जे ग्राहक ॲमेझॉन प्राईमचे सदस्य आहेत त्यांना मात्र यातलवकर प्रवेश मिळू शकतो. वापरकर्त्यांना त्यांची विशलिस्ट तयार करण्यात मदत करण्यासाठी कंपनीने आधीच काही प्रीव्ह्यू डील्स दाखवायला सुरुवात केली आहे. या सेलदरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास किंवा ईएमआय निवडल्यास 10 टक्क्यांपर्यंत त्वरित सूट मिळेल. तर यात नो-कॉस्ट ईएमआयचे पर्यायही उपलब्ध असतील, ज्यामुळे तुम्हाला महागड्या वस्तू तुमच्या सोयीनुसार हप्त्यांमध्ये खरेदी करता येतील. प्राईम सदस्यांना ॲमेझॉन पे आयसीआयसीआय कार्डवर अतिरिक्त 3 टक्के सूट आणि 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचाही लाभ मिळेल.

 

या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि ऑडिओ उपकरणांवर मोठी (discounts)सूट मिळणार आहे. प्राथमिक माहितीनुसार अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध होतील. जसे की Xiaomi Pad 8 हा 37 हजार 999 रुपयांऐवजी 30 हजारी 999 रुपयांना उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे IQOO 15R ची किंमत 53 हजार 999 रुपयांवरून 42 हजार 999 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. तर JBL 800 Pro soundbar देखील 69 हजार 999 रुपयांऐवजी 49 हजार 999 रुपयांना उपलब्ध होईल. या ऑफर्समध्ये बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर्सचा समावेश केल्यास प्रोडक्टची किमती आणखी कमी होऊ शकतात, ज्यामुळे खरेदीदारांना अधिक फायदा मिळेल.

 

उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन ॲमेझॉन या सेलमध्ये एसी, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती उपकरणांवर भरीव सवलत देत आहे. एअर कंडिशनर आणि पंख्यांसारख्या थंड ठेवणाऱ्या उपकरणांवर विशेष ऑफर्स अपेक्षित आहेत. कंपनी एक्सचेंज ऑफर्स आणि फायनान्सिंगचे पर्यायही देत आहे, ज्यामुळे ग्राहक जुन्या वस्तूंच्या बदल्यात नवीन वस्तू खरेदी करू शकतात. तर डिजिटल कूपन आणि कॅशबॅक ऑफर्ससुद्धा लाभ घेतल्याने एकूण खर्च आणखी कमी होईल. हा सेल विशेषतः उन्हाळ्यासाठी आवश्यक वस्तू खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे.

 

ॲमेझॉन वरून‍ वस्तू खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी एआय-आधारित वैशिष्ट्ये देखील सादर करत आहे. रुफस नावाचा एक एआय असिस्टंट वापरकर्त्यांना उत्तम डिल्स शोधण्यात आणि पर्सनल शिफारस करण्यास मदत करेल. यासोबतच ग्राहक 2,000 पेक्षा कमी डिल्स पाहण्यासाठी वापरकर्ते एआयची मदत घेऊन शकतात. 30 ते 90 दिवसांचा किमतीची हिस्ट्री देखील दाखवली जाईल, ज्यामुळे खरेदीदारांना वेळेवर खरेदी करता येईल. “व्ह्यू इन युअर रूम” हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना त्यांच्या घरात फर्निचर किंवा उपकरणे व्हर्चुअली पाहण्याची सुविधा देते, ज्यामुळे खरेदीचे निर्णय घेणे सोपे होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -