Sunday, May 10, 2026
Homeक्रीडाचेन्नई सुपर किंग्सचा विजय, लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट

चेन्नई सुपर किंग्सचा विजय, लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सने चांगली सुरूवात केली. मात्र त्यानंतर धडाधडा विकेट पडल्या आणि धावगतीला ब्रेक लागला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने आक्रमक सुरूवात केली. उर्विल पटेलने तर लखनौच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 23 चेंडूत 8 षटकार आणि 2 चौकार मारत 65 धावांची खेळी केली. या खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्सच्या हातून सामना निघून गेला होता. त्यानंतर चेंडू आणि धावांमधील अंतर कमी झालं आणि हा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 5 विकेट राखून जिंकला.

 

लखनौ सुपर जायंट्सचा डाव

लखनौ सुपर जायंट्सकडून जोश इंग्लिसने चांगली सुरूवात करून दिली. त्यान 33 चेंडूत 10 चौकार आमइ 6 षटकार मारत 85 धावांची खेळी केली. पण त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. मिचेल मार्श 10, निकोलस पूरन 1, ऋषभ पंत 15, एडन मार्करम 6, अक्षत रघुवंसी 18, हिम्मत सिंग 17 आणि मोहम्मद शमी 0 धावांवर बाद झाले. तर शाहबाज अहमदने 25 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 43 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्सकडून जेमी ओव्हरटनने 4 षटकात 36 धावा देत 3 गडी बाद केले. तर अंशुल कंबोजने 2 आणि नूर अहमदने 1 गडी बाद केला.

 

चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने कूच, लखनौचा पत्ता कट

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 12 गुणांसह चेन्नई सुपर किंग्सने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. आता तीन सामन्यांचा खेळ शिल्लक असून त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफचं गणित सुटणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -