Thursday, May 21, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत महापालिका सफाई कामगाराचा दगडाने ठेचून खून

इचलकरंजीत महापालिका सफाई कामगाराचा दगडाने ठेचून खून

मद्य प्राशन करताना झालेल्या वादातून महापालिकेचा सफाई कामगार विकी सुरेश अग्रवाल (वय 25, रा. शहापूर) याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

 

याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. यापैकी रिमोन आवळे याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले, तर आलोक देवर्षी नामक तिसर्‍या संशयिताचा शोध सुरू आहे.

 

येथील शांतिनगर परिसरात इंदिरानगर रस्त्यावर एका शाळेजवळ महापालिकेचे कॉम्प्लेक्स आहे. यालगतच सकाळी एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनास्थळी मिळालेल्या ‘पे स्लिप’वरून हा मृतदेह विकी याचा असल्याची ओळख पटली. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीवरून गावभाग पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकजण अल्पवयीन आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -