मिरज येथील प्रताप कॉलनीत सराईत गुन्हेगार योगेश हणमंत शिंदे याचा खून करणार्या प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोघांची रवानगी न्यालयालयीन कोठडीतील विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे.रेल्वेत विकण्यासाठी गोळ्यांचे पॅकिंग करण्याच्या करणातून तसेच दोनशे रुपयांच्या व्यवहारातून झालेल्या वादावादीतून दोघा संशयितांनी इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार योगेश शिंदे याच्या गळ्यावर हल्ला करून व गळा दाबून खून केला होता. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोघांना काही तासातच अटक केली होती.
दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी दरम्यान केलेली अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती.दोघांची अँटीजन कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात असलेले पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचार्यांची देखील अँटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.दोघांची न्यायालयीन कोठडीतील विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.