कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये अश्लील गोष्टी बोलल्या जातात. ज्याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने संताप वाढला.
एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्साही धक्कादायक आहे. आता प्रणित मोरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आधीच्या सर्व व्हिडीओची चाैकशी केली जाणार आहे. हा मोठा दणका प्रणित मोरे याला म्हणावा लागेल. गृह विभाग राज्यमंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे. अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेन्टची सायबर पोलिसांकडून सखोल चाैकशी केली जाईल. विकृत विनोद समाजात कोणीही करू नये, असेही पंकज भोयर यांनी म्हटले आहे.
यादरम्यान बोलताना पंकज भोयर यांनी म्हटले की, विकृत विनोद करणे उचीत नाही. याची सखोल चाैकशी होईल. महिला आयोगाने देखील नोटिस दिलेली आहे. आमचे सायबर सेल देखील यावर चाैकशी करत आहेत. निश्चितपणे यावर योग्य ती कारवाई केली जाईल. महिला आयोगानेही यासंदर्भात नोटीस दिलेली आहे. या समाजात अशाप्रकारचा विकृत विनोद कोणीही करू नये.
आपला देह हा समाजात कामाकरिता आला पाहिजे, म्हणून लोक देहदान करतात. अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य होत असतील तर हे निंदनीय आहे. अशा पद्धतीचे कोणी जरी कृत्य करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. म्हणजेच काय तर फक्त हे दोनच व्हिडीओ नाही तर यापूर्वी प्रणित मोरे याच्या शोमधील जितके व्हिडीओ व्हायरल झाली, त्या सर्वांची चाैकशी केली जाणार आहे.
शोमधील अश्लील गोष्टींमुळे प्रणित मोरे याचा शो वादात कायमच सापडला. मात्र, यावेळी जरा प्रणित मोरे जास्तच अडकल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता गृह विभागाकडून चाैकशीचे आदेश देण्यात आले. प्रणित मोरे याच्या शोवर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. यासोबचत त्या महिला डॉक्टरवरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.





