Homeइचलकरंजीपंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आंदोलन अंकुश आक्रमक

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आंदोलन अंकुश आक्रमक

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी कुरुंदवाड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवार १५ जून रोजी वेगळे वळण लागले.

नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतल्याची घटना घडली. या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेली ३ ते ४ महिने सातत्याने आंदोलन अंकुशचे आंदोलन सुरु आहे. सोमवारी आंदोलन अंकुश चे धनाजीराव चूडमुंगे यांनी पुन्हा जॅकवेल बंद करण्यासाठी कुरुंदवाड नगरपालिकेजवळ मोर्चा नेण्यासाठी जात असताना त्यांच्यावर व आंदोलन कार्यकर्त्यांना धरपकड करून ताब्यात घेण्यात आले असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र नाराज झाल्याने काही काळ एकदम गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, नदी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पंचगंगा

वाचवण्याची मागणी करणाऱ्यांना अटक आणि प्रदूषण करणाऱ्यांवर मौन, हा कोणता न्याय? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

 

यावेळी कुरुंदवाड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, जयसिंगपूर चे सत्यवान हाक्के, माया वायकर वरिष्ठ पोलीस अधिकारी. गावभाग इचलकरंजी, हुपरी, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -