Homeमहाराष्ट्रराम मंदिर देणगी चोरीबाबत धक्कादायक खुलासा! TIMES NOW चं थेट चंपत राय...

राम मंदिर देणगी चोरीबाबत धक्कादायक खुलासा! TIMES NOW चं थेट चंपत राय यांच्या गेस्ट हाऊसमध्ये स्टिंग ऑपरेशन

राम मंदिर चंदा चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘टाइम्स नाव’ने एक स्टिंग ऑपरेशन केले आहे. यामध्ये श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे गेस्ट हाऊस आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

 

चंपत राय यांच्या सहकाऱ्यांनी देणगी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचून देणगी देण्याची व्यवस्था करण्याचे आणि कोणत्याही बिलाशिवाय सोने-चांदी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.

 

अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांसाठी बंद असलेले ट्रस्टच्या गेस्ट हाऊसच्या दरवाजे अंडरकव्हर टीम ने स्वतःची ओळख चांदी दान करणारे म्हणून करून दिली तेव्हा उघडण्यात आले. त्या वेळी टीमला सांगण्यात आले की, ट्रस्टमध्ये चंपत राय यांना ‘बाबूजी’ या नावाने ओळखले जाते आणि त्यांची भेट घडवून आणली जाऊ शकते.

 

या स्टिंगमध्ये स्वतःला चंपत राय यांचा जवळचा सहकारी सांगणाऱ्या प्रद्युम्न नावाच्या व्यक्तीने कथितपणे सांगितले की, जर देणगीदारांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचून देणगी द्यायची असेल, तर त्याचीही व्यवस्था केली जाईल. तसेच प्रद्युम्नने या गोष्टीला दुजोरा दिला की, चंपत राय त्याच वेळी गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित असून सतत बैठका घेत आहेत. मात्र, देणखी चोरीचे प्रकरण समोर आल्यापासून चंपत राय सार्वजनिक पातळीवर लोकांच्या नजरेतून दूर राहिले आहेत.

 

 

धक्कादायक प्रतिज्ञापत्र

 

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, प्रद्युम्नने अंडरकव्हर टीमला देणगी देण्यापूर्वी एक प्रतिज्ञापत्र तयार करण्यास सांगितले. यामध्ये देणगीदाराने असे घोषित करावे लागेल की, दान केलेल्या सोन्या किंवा चांदीवर त्याचा कोणताही हक्क राहणार नाही. यानंतर ट्रस्ट त्या देणगीचा कोणत्याही प्रकारे वापर करण्यास स्वतंत्र असेल. विशेष म्हणजे, दान केल्या जाणाऱ्या सोने-चांदीचे मूळ खरेदी बिल (ओरिजिनल बिल) मागितले गेले नाही.

 

टाइम्स नाऊच्या पत्रकारांशी झालेल्या संभाषणादरम्यान अनेकदा असे संकेत देण्यात आले की, देणगी थेट चंपत राय यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली होईल. अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होतो की, जर देणगीची प्रक्रिया त्यांच्या थेट नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे, तर ते स्वतःला या व्यवस्थेपासून वेगळे कसे काय सांगू शकतात?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -