वडोदा (गुजरात) येथील फायनान्स कंपनीमधून ४८ कोटीचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरव पांचाल (वय ४० रा. वडोदा गुजरात) व प्रकाश राजकुमार सराफ (वय ५६ रा. वडताळ खेडा, गुजरात) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी कापड व्यापारी पियुष पंकज अग्रवाल (वय २५ रा. कागवाडे मळा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, निरव पांचाल व प्रकाश सराफ यांन बडोदरा (गुजरात) येथे ग्रो वेल फायनान्स कंपनी असून त्याचा मालक आहे. देशभरातील मोठमोठ्या कंपन्यांना कर्ज पुरवठा करत असल्याचे सांगत पियुष अग्रवाल बांनाही ४८ कोटी रुपयांचे कर्ज
१५ दिवसांत मंजुर करुन देण्याचे आमिष दाखविले. या कर्जासाठी १ कोटी ५० रुपये प्रोसेसिंग फीसुध्दा घेतली. परंतु दोन वर्षे लोटली तरी आजतागायत कर्ज मंजूर केले नाही. अग्रवाल यांनी या संदर्भात विचारणा केली असता कर्ज मंजूर होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अग्रवाल यांनी प्रोसेसिंग फीपोटी दिलेले दीड कोटी रुपये परत देण्याची मागणी केली. त्यावर अग्रवाल यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे परत मिळणार नाहीत, काय करायचे ते कर असे सांगितले.
त्यामुळे अग्रवाल यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.





