Homeइचलकरंजीइचलकरंजी: संततधारमुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ

इचलकरंजी: संततधारमुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ

धरण व पंचगंगा नदी पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत चालली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी पाण्याची पातळी ५३.१० फुटांवर पोहोचली होती.

 

यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यामुळे पंचगंगा नदी पातळीत झपाट्याने बाढ झाली. पंचगंगा नदी घाटावर असलेल्या गणपती मंदिरासह विविध मंदिरांना तसेच स्मशानभूमीला पुराने वेढा दिला होता, तर जेंद्र जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी ६२.३ फुटापर्यंत गेली होती. त्यानंतर १० जून नंतर पावसाने आठवडाभर पूर्णपणे विश्रांती घेतली. त्यामुळे पुराचे पाणी पात्रात गेले होते. मात्र गेल्या दोन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात तसेच पंचगंगा नदी पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा बाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून ओढ दिलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने शेती कामांना पुन्हा वेग येत आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास पंचगंगेला पुन्हा पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंचगंगेची इशारा पातळी ६८ फूट तर धोका पातळी ७१ फूट आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -