मेष: प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील.
वृषभ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
सिंह : हितशत्रूंचा त्रास संभवतो. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
कन्या : नवीन परिचय होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तूळ : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
धनू : कर्जप्रकरणे मंजूर होतील. व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल.
मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
