Homeकोल्हापूरभरधाव कारची दुचाकीला धडक: बँक व्यवस्थापक ठार, पत्नी गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक: बँक व्यवस्थापक ठार, पत्नी गंभीर जखमी

वडगाव-हातकणंगले मार्गावर मिणचे गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बँक व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला.दीपक रावसाहेब शिंदे (वय ४५, रा. मिरज, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी आशाराणी शिंदे (वय ४०) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (दि.२८) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

 

मूळचे तळसंदे येथील दीपक शिंदे हे एचडीएफसी बँकेच्या सांगली शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. रविवारी ते पत्नी आशाराणी, मुलगा हर्षवर्धन आणि वडील रावसाहेब यांच्यासह दोन दुचाकींवरून आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांनी पेठवडगाव येथील सासुरवाडीत मुक्काम केला. सोमवारी सकाळी सर्वजण दोन दुचाकींवरून मिरजकडे निघाले होते

 

मिणचे गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून येणाऱ्या कारने (एमएच १४ जीयू ८७५०) दीपक शिंदे यांच्या दुचाकीला (एमएच १० बीएल १६६१) जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दीपक शिंदे दुचाकीसह दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेल्या पत्नी आशाराणी या गंभीर जखमी झाल्या.

 

कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत हा अपघात घडल्याने घटनास्थळी आक्रोश झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक शिंदे यांच्या मृतदेहाची पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तळसंदे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

या प्रकरणी विजय बाळासाहेब यादव (रा. पेठवडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक साहिल राजू फातल (वय २४, रा. यड्राव, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार इंद्रजित शिंदे पुढील तपास करीत आहेत.

 

कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत काळाचा घाला

 

दीपक शिंदे, पत्नी आशाराणी, मुलगा हर्षवर्धन आणि वडील रावसाहेब हे दोन दुचाकींवरून मिरजकडे जात होते. मिणचे गावच्या हद्दीत कारने दीपक यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आशाराणी गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांसमोरच घडलेल्या या दुर्घटनेनंतर घटनास्थळी झालेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -