Homeकोल्हापूरकोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

माले (ता. पन्हाळा) येथील गाव तलावामध्ये माया अशोक कुलकर्णी (वय ६०) या महिलेचा मृतदेह (Maya Kulkarni death) आढळला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (ता.३) सकाळी ८.३० पूर्वी गावतलावामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. तो माया कुलकर्णी (रा. माले ता. पन्हाळा) यांचा असल्याचे खात्रीशीर स्पष्ट झाले.

 

त्या कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) नगररचना विभागातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे. माया यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोडोली पोलिस ठाण्यात याची अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद सविता धनंजय जोशी (रा. कोल्हापूर) यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -