आई कुठे काय करते मधून संजना म्हणजेच रुपाली भोसले हिने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. तिच्या एका नव्या प्रोजक्टवर काम सुरू आहे. ती एका मराठी गाण्यात दिसणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील प्रत्येक कलाकाराची चाचणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या मालिकेतून रुपाली भोसले संजनाची भूमिका साकारलीय. तिला या नावानेच प्रसिध्दी मिळालीय. आता तिचा इन्स्टावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती नऊवारी साडीत दिसते.
मालिकेत संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेला कोरोनाची लागण झालीय. तिने ही माहिती इन्स्टा स्टोरीवरुन दिली होती. रुपाली भोसले सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. ती घरातचं क्वारांटाईन झाली आहे. ”सर्व काळजी घेऊन ही माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी लवकरच यातून बरी होईन, प्लीज सगळ्यांना काळजी घ्या, मास्क लावा आणि शक्य असले तर घरीच राहा.” अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे.