केपटाऊनमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी राखून जिंकला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
भारताने आफ्रिकेत 2010-11 साली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. तीच भारताची आफ्रिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने आफ्रिकेत 2010-11 साली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती. तीच भारताची आफ्रिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारताचा दुसरा डाव काल 198 धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून ऋषभ पंतने झुंजार शतकी (नाबाद 100) खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने दुसर्या डावात 198 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावातील 13 धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 3 गडांच्या बदल्यात पार केले.