Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोंबडा लिलाव करण्याची पोलिसांवर आली वेळ

कोंबडा लिलाव करण्याची पोलिसांवर आली वेळ

पाथर्डी शहरात अवैध पद्धतीने चालू असलेला कोंबड्यांचा खेळ पोलिसांनी उधळून लावत जप्त केलेल्या ३ फायटर कोंबड्यांचा लिलाव केला. पाथर्डी पोलिसांनी रविवारी छापा टाकून तिघांना अटक केली. उर्वरित १० ते ११ जण फरार आहेत.

पाथर्डी शहारा जवळील असणा-या माळी बाभूळगाव हद्दीत आणि धामणगावच्या शिवा लगत डोंगराळ भागात ही कारवाई केली. करीम सय्यद सय्यद (वय २३, रा. अंगूरीबाग मोढारोड, औरंगाबाद), अनिस रफीक शेख (वय ३४ रा. लक्कडकोट, येवाला, ता.येवाला जि. नाशिक), ओंकार कैलास चव्हाण (वय २९, रा. गणेशपेठ पुणे, ता.जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस प्रवीण पाटील,पोलीस कॉन्स्टेबल तानाजी सानप, सागर मोहिते आदींनी ही कारवाई केली आहे. खेळणा-यांपैकी उर्वरित फरार झालेल्या तिघासह ११ ते १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात जप्त करण्यात आलेल्या कोंबड्याचा पंचासमक्ष पाथर्डी पोलिसांनी लिलाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -