Monday, December 23, 2024
Homeक्रीडाCricket Score: सीरीजमध्ये आज प्रतिष्ठा वाचवण्याचं टीम इंडियापुढे चॅलेंज

Cricket Score: सीरीजमध्ये आज प्रतिष्ठा वाचवण्याचं टीम इंडियापुढे चॅलेंज

ताजी बातमी ऑनलाइन टीम

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज वनडे सीरीजमधील (one day series) शेवटचा सामना होत आहे. कॅपटाऊनच्या न्यूलँडस मैदानावर हा सामना होणार आहे. भारताचा याच मैदानावर मागच्या आठवड्यात कसोटी मालिकेत पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप विजय मिळवण्यापासून रोखण्याचे भारतासमोर आव्हान आहे. निराशाजनक दौऱ्याचा समाधानकारक शेवट करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वनडे सीरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवण्याचे टीम इंडिया पुढे लक्ष्य असेल.

भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका: टेंबा बवुमा (कर्णधार), यानमन मलान, क्विंटवन डिकॉक (विकेटकिपर), एडन मार्करम, रेसी वान डर डुसें,डेविड मिलर, एंडिले फेहुलकवायो, सिसांदा मगाला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी.

दक्षिण आफ्रिककडे विजयी आघाडी
तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. आज शेवटची लढत आहे.

भारतीय गोलंदाज करिष्मा दाखवणार?
पहिल्या दोन वनडेमध्ये गोलंदाजांनी करिष्मा दाखवला नव्हता. आज ते करिष्मा दाखवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -