ताजी बातमी ऑनलाइन टीम
पुणे, 25 जानेवारी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येकाने कधी ना कधी गुगल कंपनीत काम करण्याचं स्वप्न पाहिलेचं असेल. हे स्वप्न आता सत्यात उतरवण्याची संधी निर्माण झाली आहे.
गुगल भारतात नवीन कार्यालय उघडणार आहे. गुगलचे हे नवे कार्यालय पुण्यात असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस कार्यालय सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतातही भरती सुरू केली आहे.
गुगलच्या (Google Hiring) गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे. भारतातील गुगल क्लाउड (Google Cloud) इंजिनीअरिंगचे व्हीपी अनिल भन्साळी म्हणाले की, भारत हे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे केंद्र बनले आहे. गुगल क्लाउडसाठी आवश्यक टॅलेंट पूल भारतात आहे. याच कारणामुळे गुगलसाठी भारत सर्वोत्तम स्थान आहे.
भन्साळी म्हणाले की, गेल्या 12 महिन्यांत कंपनीने भारतात उभारल्या जाणाऱ्या डेव्हलपमेंट सेंटरसाठी भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी प्रतिभावंतांची नियुक्ती केली आहे. आमच्या जागतिक अभियांत्रिकी संघाच्या सहकार्याने ते प्रगत क्लाउड तंत्रज्ञान (Advanced cloud technology) विकसित करतील. Golden Chance! इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक भरती सुरू भन्साळी म्हणाले की, आयटी हब म्हणून पुण्यातील आमचा विस्तार आम्हाला अव्वल टॅलेंटला आमच्यासोबत जोडण्यासाठी मदत करणार आहे.
वाढत्या ग्राहक वर्गाला प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी Google हे कार्यालय उघडत आहे. पुणे कार्यालय Google क्लाउडच्या जागतिक अभियांत्रिकी संघांच्या सहकार्याने प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करेल, रिअल-टाइम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि अंमलबजावणी कौशल्य प्रदान करेल. कशी करावी Google मधील मुलाखतीची तयारी? Google ची मुलाखत प्रक्रिया खरोखर आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी घेते. त्या बिल्डिंग ब्लॉक्सला बळकट करण्याचं काम करा आणि टेक्निकल ज्ञानसह प्रश्नांची उत्तरं द्या.
जर तुम्ही प्रश्नांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की बेसिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यानुसारच मुलाखतीचा अभ्यास करा. स्वतःवर विश्वास ठेवाGoogle मध्ये नोकरी करत यश संपादन करणारे आकाश मुखर्जी तरुण उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा, विशेषत: कठीण काळात आणि अपयशांमध्ये. फक्त अपयशाच्या भीतीवर मात करा आणि त्यातून शिकायला सुरुवात करा. अपयश आपल्याला यशापेक्षा बरेच काही शिकवतं. त्यामुळे हिंमत गमावू नका.
Google मध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी ! पुण्यात उघडणार ऑफिस जाणून घ्या तुम्हाला काय करायचं ?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -